Free Kitchen Kits बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा कीटसह किचन कीट देखील मिळणार आहे, या संदर्भात शासनाने नवीन जीआर प्रकाशित केलेला आहे. मोफत सुरक्षा किट आणि किचन किट काय? हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
महाराष्ट्र सरकारने 18 जून 2025 रोजी कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला यामध्ये इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण विभागाने बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी Free Kitchen Kits आणि सेफ्टी Kits देण्याची घोषणा केली आहे.
Free Kitchen Kits 2 kit फायदे काय मिळणार?
सुरक्षा किचन किट : यामध्ये घरगुती वापरासाठी उपयोगी असणाऱ्या 30 दैनंदिन वस्तूंचा या कीटमध्ये तुम्हाला दिला जातो.
Essential Safety Kit (सेफ्टी किट) : ज्या कामाच्या ठिकाणी ज्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेले साहित्य हे तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं.
सुरक्षित मध्ये कोणता वस्तू मिळतात..?
25 किलो आणि 22 किलो क्षमतेचे दोन धान्य पेट्या, आणि चहा पत्तीचे डबे, पत्र्याचे पेटी (साठवणुकीसाठी), प्लास्टिकचे चटई, चादर, बेडशीट, आणि ब्लॅंकेट, 18 लिटर क्षमतेचा वाटर प्युरिफायर या वस्तू दिल्या जातात.
सेफ्टी किट मध्ये कोणते वस्तू मिळतात..?
- सेफ्टी हेल्मेट
- गॉगल्स
- सेफ्टी ग्लोज
- सेफ्टी शूज
- मास्क इयर प्लग
- सेफ्टी होर्नेस बेल्ट
- रिफ्लेक्टिव्ह जॅकेट
- सौर उर्जेवर चालणारा टॉर्च
- मच्छरदानी
- पाण्याची बॉटल
- स्टील टिफिन डब्बा
- ट्रॅव्हल बॅग
या इत्यादी सुरक्षा साधने कामगाराच्या कामाच्या ठिकाणी अपघात, आरोग्य समस्या टाळण्यासाठी ही उपयुक्त आहेत अशा या ठिकाणी दिल्या जातात.
मोफत सुरक्षा किट आणि किचन किट लाभासाठी कामगारांना कुठे अर्ज करावा ?
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत या ठिकाणी लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. कामगारांनी संबंधित विभागीय कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जासाठी फारसे कागदपत्र आवश्यक ते मार्गदर्शन कामगारांना संपूर्ण प्रक्रिया समजून सांगितले जाईल. त्यामुळे संपर्क तुम्हाला महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळात करावी लागणार आहे.







