Weather Update 2025 नमस्कार मित्रांनो आज राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहेत तर 14 जिल्ह्यांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहेत. मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची ओढ दिले आहेत. तर कोकण आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
सध्या राज्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहेत आज 26 जून रोजी संपूर्ण राज्यात हवामानाची स्थिती कशी राहणार आहे. हे आपण पुढील जाणून घेऊया मुंबई शहर, आणि उपनगरात ढवळा आकाश राहील तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
तर संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहेत. या तिन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. तर पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, आणि सांगली, मध्ये काही हलका आणि मध्यम पावसाची शक्यता आपल्याला देखील दिसणार आहे .
उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर नाशिक या ठिकाणी मध्यम पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना हलका व मध्यम पावसाची शक्यता वर्तनात आली आहे.







